पत्रादेवी ते पोळे महामार्ग आता फोर लेन होणार हे नक्कीच, पण कधी । त्या मुळे होणारे अपघात थांबतील का । की सुसाट वेगाची नशा अनेकांचे प्राण घेइल । ही माझया मनाची शंका। मी पण एक प्रवासी याच रस्त्याचा । पण मला नेहमीच वाटते माझा मनावर कंट्रोल आहे , पण समोरचा चुकला तर मग आली पंचाइत।एक तर हॉस्पिटल नाहीतर ढगात। मागच्या पंधरा दिवसातली घटना सकाळी ऑफिस ला येताना समोर अपघात झालेला, बॉडी रस्त्यावर रक्ताच्या थारोळयात पडलेली। मनात अनेक विचार " कोण असेल तो? मित्राने सांगितले "अरे तो क्रोसींग कड़े असणारा वेडा तो चिरड़ला।" कामाच्या लोड मध्ये या गोष्टीचा विसर पडला । संध्याकाळी वापस घरी जाताना समोर तेच रक्ताचे थारोळे किंचित सुकलेले पण बॉडी नेलेली । परत मनात विचार अणि रूम वर आगमन । चेहरा पडलेला पाहून बायको ने चौकशी केली आणि माझया कडून रिपोर्ट घेतला । वर तीचं उत्तर " सुटला बिचारा या जगातून । तुम्ही टेंशन घेऊ नका उद्दया आपली गाडी धुवून घ्या , चाकाना रक्त लागलं असेल । परत मी विचारात "अरे आपण च याला जबाबदार कारण आपला कुणी असला तर हळहळ आणि दुःख जर बेवारस असला तर दुर्लक्ष।
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment